महाराष्ट्रविशेष
Trending

धक्कादायक! गणेशोत्सवाच्या आगमनाची मिरवणूक.. युवकाचा विजेचा धक्का लागून दुर्देवी मृत्यू

गणेश आगमनाच्या मिरवणुकीत विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू….

सध्या महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे. लहान थोरांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच गणेशोत्सव बद्दल प्रचंड उत्साह असतो. मात्र गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का हातातील झेंड्याच्या लोखंडी राँडला लागून एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ओरिसा येथे घडली आहे.

मूळचा महाराष्ट्रातील बुलढाणा येथील सोहम सावळे असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे तो ओरिसा येथे शिक्षणासाठी रहात असून त्याच्या विद्यालयात गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने गणेश आगमनाची मिरवणूक चालली होती. सोहमने हातात झेंड्याचा राँड धरला होता. मात्र मिरवणूक सुरू असताना तो राँड विद्युत वाहिनीला चिकटल्याने विजेचा जोरदार धक्का लागून सोहम खाली कोसळला व गतप्राण झाला.

त्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी बुलढाणा येथे आणण्यात येणार आहे. सदर दुर्देवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button