महाराष्ट्रविशेषशहर
Trending

जेजुरी येथे भरणार १३ नोव्हेंबर रोजी सोमवती यात्रा…

दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या पार्श्वभूमीवर अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडेरायाची सोमवती यात्रेच्या नियोजना संदर्भात बैठक जेजुरीतील ऐतिहासिक गौतमेश्वर छत्री मंदिरात आज दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी पार पडली. या बैठकीला खांदेकरी, मानकरी ,श्री खंडोबा पालखी सोहळा, व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

रविवारी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी २.४४ नंतर अमावस्या सुरू होत असून सोमवारी दुपारी २.५६ पर्यंत अमावस्येचा काळ आहे. श्री खंडोबा देवाचे मानकरी व इनामदार राजेंद्र पेशवे यांनी असे सांगितले की, पालखी सोहळा सोमवारी सकाळी सात वाजता गडावरून कर्हा नदीवर स्नानासाठी मार्गस्थ होईल व परंपरेनुसार कर्हा नदीवर उत्सव मूर्तींना स्नान घालण्यात येईल.

पालखी सोहळा गडावरून निघाल्यानंतर धालेवाडी रोड मार्गे, मार्गस्थ होईल. श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने पालखी सोहळा येण्या जाण्याच्या मार्गाची दुरुस्ती, पालखी सोहळ्यातील सहभागी भाविकांना धालेवाडी येथील रेल्वे गेट जवळ चहापाणी व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. पालखी सोहळा धालेवाडी तून कर्हा नदी येथून स्नानानंतर मार्गस्थ होऊन कोरपड मळा, विद्यानगर मार्गे श्री जानुबाई मंदिरात स्थिरावेल. पालखी सोहळा मंदिरात पोहोचल्यानंतर नंतर तेथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली. तसेच सोमवती यात्रा ही दिवाळी सणात आल्यामुळे संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच जुलै महिन्यात सोमवती यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची पार्श्वभूमी लक्षात घेता देवस्थानकडून पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली असून पालखी मार्ग मोकळा करण्यात आला असून ठिकठिकाणी बँरीकेटस लावण्यात आले आहेत. व योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पुरंदर चे तहसीलदार व पदसिद्ध विश्वस्त विक्रम राजपूत, मार्तंड देव संस्थांनचे अध्यक्ष पोपटराव खोमणे,विश्वस्त मंगेश घोणे, अभिजीत देवकाते, पांडुरंग थोरवे, पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, खंडोबा देवाचे मानकरी व इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, छबन कुदळे ,अजिंक्य देशमुख, गणेश आगलावे, श्री मार्तंड देव संस्थांनचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button