
अजिंक्य देव खंडोबा चरणी नतमस्तक
कुलधर्म कुलाचार करत घेतले दर्शन

जेजुरी दि.२(प्रतिनिधी) – मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीत अधिराज्य गाजवणारे अजिंक्य देव यांनी जेजुरी च्या खंडोबा देवाचे दर्शन घेत त्यांच्या येऊ घातलेल्या सहा चित्रपटांसाठी संकल्प सोडला आहे अजिंक्य देव यांनी खंडोबाचे दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचार करत तळी भंडार करून मंदिरासमोर असणाऱ्या कासवावर भंडाऱ्याची उधळण केली.
जेजुरी चा खंडोबा व तुळजापूरची देवी तुळजाभवानी आमचे कुलदैवत असल्याचे देव यांनी सांगितले गडावर दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी अजिंक्य देव यांच्या बरोबर फोटो काढून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या मार्तंड देवसंस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, राजेंद्र खेडेकर यांनी त्यांचा शाल श्रीफळ व खंडोबा देवाची प्रतिमा देऊन सन्मान केला यावेळी त्यांचे समवेत जेजुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेजुरी शहर अध्यक्ष रमेश लेंडे आदी उपस्थित होते



