Uncategorized

जेजुरी (विद्यानगर ) येथे सोळा वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या.

जेजुरी येथ विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची आत्महत्या….

नमस्कार जेजुरी येथील विद्यानगर परिसरातील एका सोळा वर्षीय विद्यार्थ्यांने घरातील अँगल ला ओढणी बांधून गळफास घेतल्या असल्याची घटना घडली आहे. जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षय पंढरीनाथ मोरे हे त्यांची आई मीना, पत्नी हर्षदा मुलगा शार्वील यांच्यासह एकत्र राहण्यास आहेत जेजुरी मधील खंडोबाच्या मंदिर मध्ये पुजारी असून मावस बहीण अंबिका पाले तिचे पती शेखर व त्यांचा मुलगा राजवीर शेखर पाले यांच्यासह विद्या नगर परिसरात राहण्यास आहेत.
राजवीर शेखर पाले वय 16 राहणार विद्यानगर जेजुरी तालुका पुरंदर याने दिनांक 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आपले राहत्या घरी दरवाजातून कडी लावून अँगल ला ओढणी बांधून गळफास घेतला असल्याचे अंबिका पाले यांच्या निदर्शनास आले.व त्यांनी त्याला तात्काळ जेजुरी आयसी हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे डॉक्टरांनी तो मयत झाला असल्याचे सांगितले. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन येथे अक्षय पंढरीनाथ मोरे वय 29 यांनी फिर्याद दाखल केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास स. पो. नी दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर पुजारी हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button