महाराष्ट्र
Trending

कोयता घेऊन बारामती शहरात दहशत करणाऱ्या युवकास पोलिसांनी केले जेरबंद….

कोयता घेऊन बारामती शहरात दहशत करणाऱ्या युवकास पोलिसांनी केले जेरबंद ….

नमस्कार, सध्या कोयता हातात घेऊन दशहत माजवणे हा युवकांचा एक फंडा झाला की काय असा प्रश्न पडला आहे. दौंड मध्ये दोन दिवसांपूर्वीच कोयता घेऊन दहशत माजवणे प्रकरणी दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले होते. बारामती शहरात एक युवक हातात कोयता घेऊन दशक माजवत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून बारामती पोलिसांनी त्यास तत्काळ ताब्यात घेतले आहे व त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत दिनांक ९ ऑगस्ट रोजी रात्री एकच्या दरम्यान बारामती शहरालगत मौजे जळोची गावालगत हॉटेल कॉर्न कट्टा येथे एक युवक हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत कोयता दाखवून दहशत निर्माण करून माझा नाद करायचा नाही. एकेकाला तोडून टाकतो. असे म्हणत कोयता हवेत फिरवत होता. या घटनेची माहिती बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळताच त्यांनी तात्काळ याबाबत कारवाई करण्याचे आदेश बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना दिल्याने त्यांनी त्या ठिकाणी पोलीस स्टाफ पाठविला असता तो युवक हातात कोयता घेऊन दशक माजवत असल्याचे दिसून आला. लागलीच पोलिसांनी उमेश खोमणे वय २६ वर्ष राहणार पिंपळी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. यास.ताब्यात घेऊन त्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे,सपोनी वाघमारे, सहाय्यक फौजदार जगदाळे पोलीस कॉन्स्टेबल नीकाम, चालक मोघे, होमगार्ड नागे यांनी सदरची कामगिरी केली असून पुढील गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार काळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button