पुरंदर भाजपच्या वतीने जेजुरी शहराला वरदान ठरणाऱ्या मांडकी डोह योजनेचे जलपूजन संपन्न..।

पुरंदर भाजपच्या वतीने जेजुरी शहराला वरदान ठरणाऱ्या मांडकी डोह योजनेचे जलपूजन संपन्न..।

नमस्कार जेजुरी शहराला सध्या पाणीटंचाईचा सामना सहन करावा लागत आहे जेजुरी शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणी टंचाईचे संकट भीषण होत असतानाच जेजुरी शहराचे भाजप अध्यक्ष गणेश भोसले, माजी अध्यक्ष सचिन जी पेशवे, भाजप उपाध्यक्ष विक्रम माळवदकर यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत मांडकी डोह योजनेचे थकलेले सुमारे तीन कोटी रुपयांचे लाईट बिल थकले होते याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली होती.

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मध्यस्थीने या लाईट बिलाचा विषयावरती यशस्वी तोडगा निघाल्याने प्रशासनाने सदर लाईट बिलापैकी सुमारे 30 लाख रुपयांचा पहिला हप्ता म्हणून लाईट बिल भरल्यानंतर तत्काळ या योजनेतील अडचणी दूर होऊन ही योजना मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच आज पुरंदर तालुका भाजपच्या वतीने तसेच जेजुरी शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी पंपसेट हाऊसचे पूजन करून सदर डोहतील पाण्याचे पूजन केले .येत्या दहा ते पंधरा दिवसातच जेजुरी शहराला मानकिडो योजनेवरून सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगितले आहे याप्रसंगी पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश जगताप, पुणे जिल्हा सचिव तसेच पुरंदर विधानसभा विस्तारक शैलेंद्र ठक्कार, पुरंदर महिला आघाडीचे अध्यक्षा मंगल ताई पवार ,जेजुरी शहर चे अध्यक्ष गणेश भोसले, उपाध्यक्ष विक्रम माळवतकर ,जेजुरी शहर महिला आघाडीचे अध्यक्षा उमा खुंटे जयश्री घोडके पूजा कांबळे तसेच मांडकी गावातील माणिक मोरे बजरंग किनाळे, रणजीत जगताप, भाजप विद्यार्थी चे युवक अध्यक्ष अथर्व भोंगळे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांनी असे सांगितले की भाजप हा नेहमी विकासाला प्राधान्य देणारा पक्ष असून भाजपच्या माध्यमातून जेजुरी शहरात तसे तालुक्यात विविध विकासकामे सुरू असून फक्त केलेल्या कामाचे श्रेय भाजप घेत असतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.


