Uncategorized
Trending

सोमवती यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री खंडेरायाचे दर्शन .भंडारा व खोबरे उधळत केला जयघोष.

सोमवती यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री खंडेरायाचे दर्शन . भंडारा व खोबरे उधळत केला जयघोष.

नमस्कार, अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या जेजुरी नगरीत आज सोमवती यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. काल सायंकाळपासूनच जेजुरीतील श्री खंडोबा मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. काल रविवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास अमावस्या सुरू झाल्याने आज दिवसभर अमावस्या असल्याने जेजुरी नगरीत लाखो भाविक दाखल झाले होते. जेजुरी गडावर दुपारी एक वाजता पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांच्या मूर्ती पालखीत ठेवताच लाखो भाविकांनी “येळकोट येळकोट जय मल्हार” चा जयघोष करत भंडारा व खोबऱ्याची मोठ्या प्रमाणावर उधळण केली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कर्हा नदीवर देवाच्या उत्सव मूर्तीला स्नान घालण्यात येईल. व त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा परतीकरता प्रस्थान होईल. आज पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी खंडोबा देवाचे मानकरी, सेवेकरी, खांदेकरी व मार्तंड देवस्थानचे विश्वस्त ,कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button