Uncategorizedमहाराष्ट्र

जेजुरी सोमवती यात्रेतील घटनेतील जखमींची वैद्यकीय खर्चाची जबाबदारी मार्तंड देव संस्थान उचलणार…।

जेजुरी सोमवती यात्रेतील घटनेतील जखमींची वैद्यकीय खर्चाची जबाबदारी मार्तंड देव संस्थान उचलणार…।

नमस्कार, अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी येथील श्री खंडेरायाची सोमवती यात्रा सोमवार दिनांक १७ रोजी पार पडली. रविवारी संध्याकाळपासूनच अमावस्या सुरू झाल्याने रविवार संपूर्ण दिवसभरापासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर जेजुरीमध्ये गर्दी केली होती. श्री खंडोबा मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री म्हाळसादेवी व श्री खंडेराया यांच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवल्लयानतंर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली .यावेळी गडकोट आवर परिसरात भाविकांची तुडुंब गर्दी झाली होती. पालखी पायरी मार्गावरून खाली येत असताना भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने हा गर्दीचा लोंढा पालखी समोर सनई चौघडा वाजवण्याचा पारंपारिक मान असणाऱ्या युवकांच्या अंगावर आल्याने ते तरुण खाली पडले. व त्यांच्या अंगावर भाविक पडले व यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला.यात अरुण निलेश मोरे या तीस वर्षीय युवकाला छातीच्या बरगड्याला जबर मार बसला. तसेच विशाल मोरे, माऊली मल्हार मोरे व मयंक सचिन कदम हे हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मार्तंड देव संस्थांनचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना वैद्यकीय उपचारासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे हलवले. तिथे वैद्यकीय अधीक्षक मनोहर सोनवणे यांनी तातडीचे वैद्यकीय उपचार केले. व पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व जखमींचा संपूर्ण वैद्यकीय उपचाराचा खर्च मार्तंड देव संस्थान तर्फे करण्यात येईल. अशी माहिती प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे यांनी महाराष्ट्र प्रवाहशी बोलताना दिली. व भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी पुढील यात्रा, उत्सव काळात अत्यंत काटेकोरपणे नियोजन केले जाईल. काल दिवसभर या घडलेल्या प्रकाराची चित्रफीत सामाजिक माध्यमावर फिरत होती. या सोमवती यात्रेनिमित्त सुमारे साडेतीन ते चार लाख भाविकांनी गर्दी केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .काल संपूर्ण दिवसभर जेजुरी शहरात याच घटनेची चर्चा ऐकावयास मिळत होती. पुन्हा भविष्यात असा घटना घडू नये यासाठी योग्य ते नियोजन होणे गरजेचे आहे असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button