अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस चोवीस तासात अटक …सासवड पोलिसांची कामगिरी
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस चोवीस तासात अटक …सासवड पोलिसांची कामगिरी
नमस्कार, सासवड पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या परराज्यातील तरुणास अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे. सासवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याची तक्रार सासवड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या अनुषंगाने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी तपासी अंमलदार व गुन्हे शोध पथकाला सदर अल्पवयीन पीडित मुलगी व आरोपी यास अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक विनय झुंजुर्के, गणेश पोटे, अभिजीत कांबळे, गोकुळ हिप्परकर, निलेश जाधव यांनी आरोपीच्या मोबाईलचा तांत्रिक अभ्यास केला. व त्याचा सासवड ,हडपसर ,हांडेवाडी, मंतरवाडी फाटा, कात्रज ,पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी कसून शोध घेतला. यातील अल्पवयीन पीडित मुलीस. आरोपी हा उत्तर प्रदेश येथे पळून घेऊन जाण्याच्या तयारीत असताना त्यांना हडपसर येथून ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपीचे नाव चंदू उर्फ चंदर यादव असून हा वाराणसी उत्तर प्रदेश येथे राहणारा आहे. त्याला भा. दं. वि. कायदा कलम ३६३,३७६ सह पोक्सो कलम ५६ कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे भोर विभाग, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनय झिंजुर्के सुप्रिया दूरंदे ,गणेश पोटे, अभिजीत कांबळे ,गोकुळ हिप्परकर, निलेश जाधव, सुरज नांगरे यांच्या पथकाने केली आहे.