Uncategorized

“चंदुकाका जगताप यांनी मला मुलाप्रमाणे संभाळले” – ग्रामीण साहित्यीक बाळ यादव.

चंदुकाका जगताप यांनी मला मुलाप्रमाणे संभाळले – ग्रामीण साहित्यीक बाळ यादव

जेजुरी वार्ताहर : –
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित माहूर माध्यमिक विद्यालय माहूर या विद्यालयात मार्च – २० २३ च्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या शुभ चिंतनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ग्रामीण साहित्यीक बाळ यादव यांनी मत व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पुणे जिल्हा परिषदेचे माजी आदर्श जि प सदस्य तथा माहूर गावचे इनामदार हेमंत कुमार माहूरकर उपस्थित होते . प्रमुख पाहुणे म्हणून स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संतोषशेठ जगताप , सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री तुषार शेठ माहूरकर , सरपंच मेघाताई जगताप , उपसरपंच सौ पुनम ताई माहूरकर , तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप उपस्थित होते .
अपार कष्ट , आई वडीलांचे आशीर्वाद आणि ज्ञान देणाऱ्या शिक्षकांमुळेच माणूस मोठा होतो . शिक्षक हे ज्ञानपंढरीचे वारकरी आहेत . शिक्षक नावाची देवालाही नवलाई वाटते . तुमच्या पंखात गरूडपंखी बळ शिक्षक देतो . शिक्षक म्हणजे ज्ञान वृक्षाची सावली अन आशीवार्दाच्या अखंड लहरी , बुद्धीला सत्याकडे , शरीराला श्रमाकडे , जीवनाला यशाकडे शिक्षकांमुळेच जाता येते . काहीतरी भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करा कोंबाचा वृक्ष करा . थेंबाचे तवे व्हा . बिंदूचा सिंधु व्हा आणि हिमकणांचा हिमालय व्हा . असे ज्येष्ठ साहित्यीक बाळ यादव यांनी मुलांना सांगीतले .
स्व . एकनाथ काका जगताप प्रतिष्ठान सासवड च्या वतीने इ १०वीच्या सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक च्या किटचे वितरण व विघालयातील सर्व १८२ विद्यार्थ्यांना सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगताप यांनी असे सांगीतले की माहूर विद्यालयातील विद्यार्थी तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर प्रतिष्ठान च्या वतीने त्याला रोख ५००० | – रु . बक्षिस व ट्रॉपी देण्यात येईल .
यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री तुषारशेठ माहूरकर , गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर जगताप विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शैलजा कोंडे यांनी मनोगत व्यक्त केले .
अध्यक्षीय भाषणात हेमंतकुमार माहूरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . त्याचप्रमाणे प्रत्येकाचे व्यक्तीमत्व वेगळे आहे . मोठी स्वप्ने पाहा . प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा . आनंदाने परीक्षेला सामोरे जाऊन उत्तम गुण मिळवा असे अध्यक्षीय भाषणांत माहूरकर म्हणाले . त्याचप्रमाणे दिवाळी मध्ये घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धांचा बक्षिस वितरण कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला . कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक ‘ शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री महेंद्र भोसले यांनी तर आभार श्री रामप्रभू पेटकर यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button