Uncategorized

BIG BREAKING.बारामती शहरात गावठी पिस्तूल व तलवारी जप्त.

बारामती शहरात गावठी पिस्तूल व तलवारी जप्त.

बारामती शहरांमध्ये मिळालेल्या माहिती आधारे शहर पोलिसांनी शहरातील वडकी नगर, आमराई येथील इसम नेहल उर्फ रावण विजय दामोदर यांच्या घरात गावठी पिस्तल व तलवारी ठेवले असल्याची माहिती मिळाली.सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ सदर इसमाची घरझडती घेण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस शिपाई अक्षय सिताब ,तुषार चव्हाण, दशरथ इंगवले ,पोलीस हवालदार शिंदे जामदार यांना आदेश दिले .आणि घरा मध्ये एक गावठी पिस्तूल व मॅक्झिम ,एक जिवंत काडतुस तसेच पाच धारदार तलवारी मिळून आल्या. सदर इसमावर भारतीय हत्यार कायदा कलम 3 25 27 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर इसमाला माननीय न्यायाधीश अण्णासाहेब गिरे यांच्या कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. सदर पिस्तूल चा वापर कुठे झाला आहे का याबाबत आणखी तपास सुरू आहे .तसेच सदर पिस्तल हे त्याने का जवळ बाळगले. याहीबाबत खातर जमा करण्याची कारवाई सुरू असून ,सदर हत्यारे त्याला कोणी दिली याबाबत सखोल तपास सुरू आहे.
बारामती शहरात माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलिसांना बारामती हे विकसित शहर असून त्यामध्ये वारंवार विविध कारणावरून नागरिकरण झाल्याने भांडण होत असतात. या भांडणामध्ये कुठेही अग्निशास्त्र किंवा हत्यारांचा वापर होऊ नये ,म्हणून कायम गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत.

अशा अवैध हत्यारे बाळगण्याबाबतची जर माहिती कुणाकडे असेल तर त्याने पोलीस स्टेशनची संपर्क करावा. कुठल्याही प्रकारे त्याचे नाव उघड केले जाणार नाही. असे आव्हान बारामती शहर पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button