महाराष्ट्रविशेषशहर
Trending

आकुर्डीतील एमबीए महाविद्यालयात “अनंत जल्लोष २०२४”अंतर्गत कार्यक्रम साजरे

आकुर्डीतील एमबीए महाविद्यालयात “अनंत जल्लोष २०२४”अंतर्गत कार्यक्रम साजरे
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये अनंत जल्लोष २०२४ अंतर्गत दिनांक २६/०२/२०२४ पासून ते दिनांक ०१/०३/२०२४ पर्यंत विविध “डेज् उत्साहात साजरे” करण्यात आले. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात वेळोवेळी अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे व विभागप्रमुख प्रा.तेजाली देसरडा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

महाविद्यालयात ब्लॅक अँड व्हाईट डे, मराठी भाषा गौरव दिन, मिसमॅच डे, बॉलीवूड डे, मॅनेजमेंट गेम्स इत्यादी वेगवेगळे डेज् साजरे करण्यात आले. त्यावेळी ट्रेझर हंट, पेपर डान्स, गेसिंग ऍक्टिव्हिटी, टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी, रॅम्प वॉक, इत्यादी अश्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन हे प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.अजित पतंगे, प्रा.पूजा प्रजापती, प्रा.प्रणव मुळे, प्रा.प्रियंका डोशी, प्रा.अंकिता व्हटकर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button