Uncategorized

जेजुरी शहर भाजपातर्फे, जानाईदेवी यात्रे निमित्त भाविकांसाठी मोफत बस सेवा.

सालाबाद प्रमाणे यंदाही जेजुरी शहर भारतीय जनता पक्षातर्फे जेजुरी तून निवकने येथील जानाई देवीच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता तर्फे आयोजित या उपक्रमाचे यंदाचे हे पाचवे वर्ष असून भाविक या सेवेचा लाभ घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही जेजुरी मध्ये जानाई देवीच्या यात्रेचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. जेजुरी होऊन मोठ्या संख्येने भावी या यात्रेसाठी जात असतात. यात महिला वर्गाची संख्या लक्षणीय असते. भारतीय जनता पक्षाचे जेजुरी शहर अध्यक्ष सचिन पेशवे व कार्यध्यक्ष गणेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बस सेवा आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच्या आयोजनामध्ये अखिल भारतीय युवक खाटीक समाजाचे अध्यक्ष मनिष उर्फ बंटी शेठ निकुडे पाटील, स्नेहा ताई गणपत दगडे. उपाध्यक्ष, पुणे जिल्हा भाजपा, अलकाताई शिंदे. सदस्य. ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्याच्या भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस एँड,श्रीकांत ताम्हाणे, पुरंदर तालुका भाजपा कार्याध्यक्ष निलेश जगताप यांनी केले आहे.
सर्व भाविकांसाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संग्राम गणपतराव देशमुख यांच्यातर्फे उंब्रज येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून पालीच्या खंडोबाचे दर्शन झाल्यानंतर तेथे सर्वांना नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपच्या याउपक्रमाचे जेजुरीत मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, भाविकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button