महाशिवरात्री निमित्त जेजुरी येथील लवथळेश्वर मंदिरात अमरनाथ गुंफा देखावा….

महाशिवरात्री निमित्त लवथळेश्वर मंदिरात अमरनाथ गुंफा देखावा
भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी
जेजुरी दि.१९(प्रतिनिधी) – जेजुरी येथील पुरातन असलेल्या लवथळेश्वर मंदिरात प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त अमरनाथ गुंफा बनवली असुन हि गुंफा पहाण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती पुरातन असलेल्या लवथळेश्वर मंदिरात शिवलिंग असुन याच मंदिरात बसून समर्थ रामदासांनी लवथळ ते विक्राळ ब्रह्मांडी माळा हि शंकराची आरती लिहिली आहे. महाशिवरात्री निमित्त या शिवलिंगाच्या दर्शनाबरोबर अमरनाथ गुंफा पहाण्यासाठी देखील भाविक गर्दी करताना दिसत होते या गुंफेत शंकर पार्वती व राज विक्रमादित्य यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने नंदा दिदी सांळूखे, ज्योती दिदी तांबे, उत्तम चांदेकर, चंद्रकांत नलवडे, निलेश भुजबळ, आत्माराम सावंत, भास्कर यादव आदिंनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तत्पूर्वी भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे, पत्रकार रंजित खारतोडे सर, पुरंदर तालुका पुरवठा विभागाच्या राधिका पवार आदिंनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले


