Uncategorized

जेजुरी येथील कापड दुकानात चोरी… पहा सविस्तर…..

जेजुरी येथील कापड दुकानात चोरी.. पहा सविस्तर…..

जेजुरी येथे पुणे पंढरपूर हायवे लगत कडेपठार कमानी जवळ असलेल्या प्रसिद्ध कापड दुकानात चोरीचा प्रकार उघडकीस आला असून सदर प्रकाराबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात प्रनिकेत राजकुमार दोशी यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रनिकेत राजकुमार जोशी यांचे कडेपठार कमानी जवळ केशर कलेक्शन नावाचे प्रसिद्ध कापड दुकान आहे. दिनांक २९ जून रोजी रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून फिर्यादी घरी गेले व सकाळी त्यांनी व त्यांचे वडील राजकुमार दोशी यांनी दुकान उघडले असता, दुकानाच्या छताला असलेले पी.ओ.पी तोडून वरील पत्रा उचकटलेला आढळून आला. त्यांनी त्वरित कँश काउंटर कडे जाऊन पाहिले असता. काउंटरच्या ड्राव्हरचे कुलूप तोडून अज्ञात चोट्याने त्यातील कापड धंद्यातील सुमारे ७० हजार रोख रक्कम लांबवल्याचे उघडकीस आले.
त्यांनी सदर प्रकाराबाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून जेजुरी पोलीस स्टेशन येथे भादवी ३८० /४५७ नुसार गुन्हा दाखल केला, असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार लोंढे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button