महाराष्ट्रविशेषशहर
Trending

मनोज जरांगे यांच्या सभेसाठी शाळांना सुट्टी !छगन भुजबळ यांची जोरदार टीका.

मनोज जरांगे यांच्या सभेसाठी शाळांना सुट्टी !छगन भुजबळ यांची जोरदार टीका.

नमस्कार ,सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र या सभासाठी शाळेला सुट्टी जाहीर करण्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणा साठी मनोज जरांगे महाराष्ट्रात ठीक ठिकाणी सभा घेत आहेत मात्र बीड जिल्ह्यात होणाऱ्या सभेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याच्या कारणावरून छगन भुजबळ यांनी समाज माध्यमातून टीका केली आहे .ते म्हणतात…

कोणत्याही सभेसाठी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचे कारण काय?

कोणत्याही सभा, मेळावे यांबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण त्यासाठी थेट शाळा बंद ठेवणं किंवा सुट्टी जाहीर करणं नक्कीच चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात होणार असलेल्या मनोज जरांगे यांच्या सभेमुळे जिल्हा परिषदेने आपल्या प्राथमिक शाळांना थेट सुट्टी जाहीर केल्याचे पत्रक काढले होते. त्याविरोधात आवाज उठविल्यानंतर रात्री उशिरा ती सुट्टीची सूचना मागे घेण्यात आली. त्याविरोधात मी जाहीर सभा, प्रसारमाध्यमे आणि विधानभवनातही आवाज उठवला होता.

आता पुन्हा बीड जिल्ह्यात जरांगे यांच्या सभेसाठी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. हे या राज्यात नेमकं काय सुरू आहे? पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सभांच्या दिवशी देखील अशा प्रकारे शाळा बंद ठेवल्या जात नाहीत, मग जरांगेंच्या सभांवेळी ही विशेष व्यवस्था कशासाठी? मराठा आरक्षणाला किंवा त्यासाठी सुरू असलेल्या सभांना माझाच काय, कोणाचाही विरोध नाही. परंतु ही झुंडशाही, हुकूमशाही सुरू आहे, त्याला मात्र नक्कीच विरोध आहे. मराठा समाजातील सुज्ञ बंधू-भगिनींना देखील हे अजिबात पटणार नाही. यातून आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न करतोय? एका समाजातील काही ठराविक लोकांच्या दबावाला, झुंडशाहीला आपला कायदा, प्रशासन बळी पडतंय का? असं असेल तर हे निश्चितच लोकशाहीला धरून नाही.

शालेय शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. नसता महाराष्ट्रातील इतर समाजांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button