महाराष्ट्र
Trending

पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज(जेजुरी) येथे जनता शिक्षण संस्थेचा ७१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

जनता शिक्षण संस्थेच्या पू. अ. वि. मं. व ए सी हुंडेकरी ज्युनियर कॉलेज जेजुरी येथे संस्थेचा ७१वा संस्था वर्धापन दिन आणि गुरुवर्य बा .ग .जगताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य ताकवले सर, पर्यवेक्षक अनिल रासकर सर ,जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि विभाग प्रमुख धनाजी वाबळे सर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार अशोक टेकवडे , प्रमुख वक्ते अशोक टाळकुटे सर, विशेष उपस्थिती डॉ प्रसाद खंडागळे , जेजुरी शहर भाजप अध्यक्ष सचिन पेशवे , जेजुरी शहर शिवसेना शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते जावेद पानसरे , जेजुरी शहर भाजपा कार्याध्यक्ष गणेश भोसले उपस्थित होते .

तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून पत्रकार नितीन राऊत, बी एम काळे, शिक्षक पालक समितीचे अध्यक्ष भोंगळे सर लाभले .या कार्यक्रमाप्रसंगी सर्व माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. प्रशालेमध्ये विविध स्पर्धांच्या मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच इ. १०वी आणि १२ वी च्या ज्या विषयांचा निकाल १००% लागला आहे अशा सर्व विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल रासकर सर, स्वागत व परिचय श्री. भराडे सर,अध्यक्षीय मनोगत प्राचार्य पोपटराव ताकवले सर, सूत्रसंचालन निगडे सर, दीक्षित मॅडम,.दरेकर मॅडम आणि आभार. गायकवाड मॅडम यांनी केले . विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने भोजन देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button