Uncategorized

“याची सुरुवात शरद पवार यांनीच केली” राज ठाकरे यांची प्रतिक्रिया…

राज्यात रविवारी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आज पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी असे सांगितले की, हा अत्यंत किळसवाना प्रकार आहे. हा मतदारांचा घोर अपमान असून सामान्य जनतेत याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. येत्या काही दिवसात मी पक्षाचा मेळावा घेणार असून याबाबत सविस्तर बोलणार आहे. तसेच रविवारी घडलेल्या राजकीय घडामोडी या महाराष्ट्राला नवीन नाहीत. याची सुरुवातच शरद पवार यांनीच केलेली आहे. १९७८ साली शरद पवार यांनीच पुलोद सरकारचा प्रयोग केला होता. त्या अगोदर असं काही घडलं नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारची सुरुवात शरद पवार यांनीच केली. आणि शेवट सुद्धा पवार साहेब यांच्याकडेच झाला. तसेच प्रफुल्ल पटेल ,दिलीप वळसे पाटील व छगन भुजबळ ही अजित पवार यांच्याबरोबर जाणारी माणसे नाहीत. तसेच त्यांनी या तीन नेत्यांच्या सत्तेत सहभागी होण्याच्या कृतीवर सुद्धा संशय व्यक्त केला. तसेच सर्व होर्डिंगवर शरद पवार साहेबांचे फोटो लावा. या अजित पवार यांच्या वक्तव्यावर सुद्धा त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच भविष्यात सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री झाल्यास मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही असेही त्यांनी सांगितले. तसेच आत्ताची परिस्थिती अत्यंत दुर्देवी असून असे कधीही घडले नव्हते. तसेच लवकर पक्षाचा मेळावा घेणार असून त्यात अधिक सविस्तर बोलेन असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button