महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
Trending

जेजुरीतील विद्यानगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला — दोन जणांचा घेतला चावा

जेजुरीतील विद्यानगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला — दोन जणांचा घेतला चावा

जेजुरी, २० नोव्हेंबर २०२५ :

मयुर कुदळे

जेजुरी शहरातील विद्यानगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव चांगलाच वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी ८ वाजता माळवदकर चाळ परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने दोन जणांच्या पायाला चावा घेतल्याची घटना घडली. जखमींना तातडीने शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर परिसरात लहान मुलांची शाळा असल्याने पालकांची चिंता अधिक वाढली आहे. त्यातच आगामी जेजुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ मधील मतदान केंद्र याच भागात निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.
नागरिकांनी यापूर्वीही नगरपालिकेकडे मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. “प्रशासन फक्त निवडणुकीच्या काळातच जागं होतं; आम्हाला रोजच धोका पत्करावा लागतो,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
घटनेनंतर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, लवकरच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी सांगितले.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तातडीने मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणावे आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button