महाराष्ट्र
Trending

पिस्तुलाचा धाक दाखवून चोऱ्या करणारी टोळी चोवीस तासात जेरबंद…. बारामती पेट्रोल पंप रक्कम लूट प्रयत्नात सहभाग..

बारामतीतील पेट्रोल पंपाची रक्कम लुटण्याची प्रयत्न करणारी टोळी जेरबंद….

नमस्कार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी बारामती शहराजवळ पाटस रोड लगत असणाऱ्या कृष्णा पेट्रोलियम या पेट्रोल पंपावरील दिनांक 5 ऑगस्ट व दिनांक 6 ऑगस्ट अशा दोन दिवसाची कॅश घेऊन मॅनेजर मयूर बाळासाहेब शिंदे हे सात ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बारामती सहकारी बँकेत भरणा करण्यासाठी कॅश घेऊन त्यांच्या मोटरसायकल वरून पाटस रोडने बारामती बाजूकडे जात असताना त्यांच्या पाठीमागून दोन अनोळखी इसम तोंडाला मास्क लावून स्प्लेंडर मोटरसायकल वरून आले. व त्यांनी शिंदे यांचे मोटरसायकलला त्यांची मोटरसायकल आडवी मारली .व त्यांना थांबविले व त्यांच्याकडे एक लाख 99 हजार रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करू लागले मात्र मॅनेजर शिंदे यांनी त्याचा जोरदार प्रतिकार केला व ती बॅग देण्यास नकार दिला .त्यावेळी त्या त्या दोन अज्ञात चोरट्यानी शिंदे यांना मारहाण केली. व त्यांच्याकडे असलेले पिस्तूल काढून ते मुठीच्या बाजूने शिंदे यांच्या डोक्यात मारून बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंदे यांनी बँग सोडली नाही. त्यावेळी रोडनी जाणारे येणारे लोक थांबू लागले. व शिंदे ही पैशाची बॅग सोडत नाही हे पाहून दोन्ही चोरटे पुन्हा पाटस बाजूकडे पळून गेले. ही बातमी कळताच बारामती एकच खळबळ माजली.

सदर घटना कळताच बारामती शहर पोलीस स्टेशन कडील पोलीस हे घटनास्थळी गेले व त्यांनी जखमी मॅनेजर शिंदे यांची विचारपूस करत त्यांना पुढील औषध उपचार करता सरकार दवाखान्यात पाठवले. ही घटना वरिष्ठ अधिकारी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश ईंगळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना कळविले असता वरिष्ठ अधिकारी यांनी पुढील तपासाबाबत योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले व तपासणी चक्रे वेगाने फिरू लागली.

सदर तपासाबाबत बारामती शहर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, बारामती तालुका, भिगवन ,माळेगाव, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन या मार्फत तपास सुरू करून तपासाचे वेगवेगळ्या टीम तयार करून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू झाला व गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही तासातच सदर गुन्हा उघडकीस आला सदरचा गुन्हा हा सदर पेट्रोल पंपावरील एक कामगार अक्षय धोईजे व त्याचे इतर दोन साथीदार यांनी संगणमत करून सदरचा गुन्हा केल्या असल्याची तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या माहितीवरून निष्पन्न करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले. दोन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे .आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार वाहन व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आले असून इतर आरोपी यांचा गुन्ह्यात सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सह पोलीस निरीक्षक सचिन काळे, सपोनी प्रकाश वाघमारे ,सपोनी दिलीप पवार ,सपोनी गंधारे ,सपोनी गावडे, पोसई अमित सिदपाटील, तसेच सहाय्यक फौजदार रविराज कोकरे ,बाळासाहेब कारंडे ,पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे ,स्वप्निल अहिवळे, राजू मोमीन ,सागर शिरसागर ,अजित भुजबळ ,विजय कांचन ,अजय घुले, बाळासाहेब खडके, अतुल ढेरे, गुरु जाधव रामदास बाबर, काशिनाथ राजापुरे व बारामती शहर पोलीस स्टेशन कडील अक्षय शिताप, मनोज पवार ,सागर जामदार, दशरथ इंगोले, यशवंत पवार ,सचिन कोकणे यांनी सदरची संयुक्तिक कामगिरी केली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी विविध ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button