दागिने पॉलिश करून देतो असं सांगत महिलेची केली फसवणूक….
नमस्कार, समाजात आपल्या हातचलाखीचा वापर करून लोकांना फसवण्याचे उद्योग अनेक वेळा घडत असतात. असाच काहीच प्रकार बारामती शहरात घडला आहे. बारामती येथे फलटण रोड लहुजी नगर येथे राहणाऱ्या बायमा कादर सय्यद वय 47 वर्ष या महिलेकडे दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान अंदाजे 30 ते 35 वयोगटातील दोन ईसम मोटरसायकल वरून आले. व आम्ही तांब्याची, पितळेची भांडी तसेच दागिने पॉलिश करून देतो. असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
व सदर महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचा गंठण आम्ही साफ करून देतो असे सांगत ते मोठ्या हातचलाखीने साफ करण्याच्या निमित्ताने अपहार केले. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच सदर महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान कायदा कलम 406, 420, 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पासगे करत आहेत.