महाराष्ट्रविशेषशहर
Trending

अवैध व्यवसाया विरोधात जेजुरी पोलिसांची धडक कारवाई …

अवैध व्यवसाय विरोधात जेजुरी पोलिसांची धडक कारवाई …

जेजुरी पोलिसांनी अवैध व्यवसायाच्या विरोधात धडक मोहीम राबवून सुमारे दोन लाख रुपयांची हातभट्टीची दारू जप्त करत ती नष्ट करण्यात यश मिळवले आहे .जेजुरी पोलिसा कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 फेब्रुवारी जेजुरी गावच्या हद्दीत सिमलेस कंपनीच्या समोर अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जेजुरी पोलिसांनी त्या ठिकाणी धाड मारली असता,

दोन लोखंडी पातेले मध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन अंदाजे किंमत एक लाख 70 हजार,निळ्या रंगाचे प्लास्टिक कॅन, ज्यामध्ये अंदाजे 30 हजार रुपयाची तयार दारू लाकडी सरपण हे जागी पंचांच्या समक्ष नष्ट करण्यात आले आहे .

ही कारवाई जेजुरी पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर पुजारी यांनी केली असून सदरची फिर्याद पोलीस नाईक गणेश मारुती नांदे यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी अंकुश राठोड वय 22 वर्ष याच्याविरोधात भादविक 328 सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे तसेच दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जवळ अजून गावच्या हद्दीत सुमारे 1200 रुपयाची गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. नव्यानेच रुजू झालेली स पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध व्यवसाय विरोधात धडक मोहीम उभारली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button