महाराष्ट्र
Trending

ब्रेकिंग न्यूज! सोमवार 28 ऑगस्ट पासून खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांसाठी दिड महिन्यासाठी बंद….

ब्रेकिंग न्यूज! जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांसाठी दिड महिन्यासाठी बंद….

नमस्कार, अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांसाठी दीड महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 28 ऑगस्ट पासून पाच ऑक्टोबर पर्यंत मंदिराचा गाभारा हा भाविकांसाठी बंदच राहणार आहे . खंडोबा मंदिरावर असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा हा दुरुस्तीच्या कामामुळे बंद ठेवण्यात येणार आहे . भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घेता येणार आहे .तसेच भाविकांना कुलधर्म कुलाचार करण्यास कोणती अडचण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे.

जेजुरी येथील भक्त निवास येथे देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ यांच्यात बैठक होऊन या निर्णयाची माहिती देण्यात आली. राज्य सरकारच्या महत्वकांक्षी अशा जेजुरी विकास आराखड्यातून जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे .सध्या गडकोट आवाराची कामे झाली असून मंदिराची आतील भागात पुरात्व विभागाकडून दुरुस्तीची कामे करण्याचे येत असल्याने सदर निर्णय घेण्यात आला आहे

.त्या अनुषंगाने हे मंदिराचा गाभारा दिड महिन्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली. या बैठकीला प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे, राजेंद्र खेडेकर अनिल सौंदाडे विश्वास पानसे, एडवोकेट पांडुरंग थोरवे, अभिजीत देवकाते, मंगेश घोणे तसेच जेजुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई ,माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, माझी विश्वस्त सुधीर गोडसे, पंकज निकुडे, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button