फुरसुंगी उरळी देवाची संयुक्त पाणीपुरवठा योजनेसाठी अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे सहकार्य… मात्र एक निष्क्रिय माणूस… आ.संजय जगताप काय म्हणाले….
आमदार संजय जगताप यांनी फुरसुंगी देवाची उरळी पाणीपुरवठा योजनेसाठी अजित पवार व सुप्रिया सुळे यांची सहकार्य लाभले असल्याबद्दल सांगितले मात्र त्याचबरोबर ” एक निष्क्रिय माणूस” असे म्हणत विजय शिवतारे यांच्यावर टीका…
नमस्कार ,पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी माजी आमदार विजय शिवतारे यांना एक निष्क्रिय माणूस असे संबोधन करत त्याच्यावर टीका केली आहे. एका वायरल पोस्टमध्ये” फुरसुंगी उरळी देवाची संयुक्त पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाच्या मार्गापासून अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी हवेली तालुक्यातील ही योजना आज पूर्णत्वाकडे जात असताना मला मनस्वी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आनंद होत आहे .यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, सन २०१३ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुरसुंगी व देवाची उरळी संयुक्त पाणीपुरवठा योजनेसाठी ७५ कोटी ६५ लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी मिळाली. तसेच सन२०१६ मध्ये या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र तत्कालीन आमदार आणि ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे केवळ लोक वस्तीत पाईपलाईन टाक्याची अर्धवट बांधून निधी संपवला. मात्र मुख्य जलस्तोत्राला लाईन जोडण्याची विसरले. म्हणजे विहीरर खोदण्यापूर्वीच पाईपलाईन अंतरनेचे काम करण्यात आले. या ठिकाणी संरक्षण विभागाच्या जागेतून पाण्याचा मुख्यालयीन पर्यंत जोडण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी नव्हती.२०१९ मध्ये मी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना काळात केंद्रात पाठपुरावा करून संरक्षण विभागाच्या जागेतून पाईपलाईन करण्यासाठी परवानगी मिळवली. तसेच या दरम्यान दोन ठिकाणच्या रेल्वे लाईन ओलांडून पाईपलाईन फुरसुंगी व देवाची उरुळी येथील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. आज दुपारी या पाईपलाईनची चाचणी घेण्यात आली अखेर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर यश मिळून योजना पूर्ण होत असल्याचा मला मनापासून आनंद होत आहे.
काहींचा निष्क्रियतेपणाचा कळस…
ही योजना होत असताना केवळ श्रेय घेण्यासाठी एक निष्क्रिय माणूस पुढे पळताना दिसत आहे. वास्तविक त्याच्याकडे संधी असतानाही केवळ त्याच्या निष्क्रियतेमुळे त्यांना ही योजना पूर्ण करता आली नाही .मात्र मतदारसंघातील विकास कामांच्या मंजुरीची खोटे पत्र घेऊन मीच केले असा हा गाजावाजा करून निष्क्रिय माणूस श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करीत आहे. त्याची निष्क्रियता तुम्ही सुज्ञ मंडळी जाणता आहातच. दहा वर्षानंतर फुरसुंगी देवाची उरुळी कराची पाण्याची प्रतीक्षा संपण्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे .याचा मला मनापासून आनंद होत आहे. मी काही प्रमाणात आम्ही तुम्हाला पाण्याच्या बाबतीत समाधान होऊ शकलो लवकर योजनेच्या पुढील टप्प्याची कामे पूर्ण होऊन पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल.