महाराष्ट्रविशेषशहर
Trending

ब्रेकिंग न्यूज! पुरंदर तालुक्यातील सुकलवाडी मध्ये भरदिवसा बिबट्याचे दर्शन…

ब्रेकिंग न्यूज! पुरंदर तालुक्यातील सुकलवाडी मध्ये भरदिवसा बिबट्याचे दर्शन

नमस्कार पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावनाजी सुकलवाडी येथे एका शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. आज दिनांक 27 ऑगस्ट रविवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान सुकलवाडी येथील चिंचेचा मळा येथे भरदिवसा एका झाडाखाली बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकार तेथील उपस्थित एका शेतकऱ्याने व्हिडिओमध्ये कैद केला असून त्याची माहिती वाल्हे येथील सामाजिक कार्यकर्ते संदेश पवार यांनी तत्काळ वन विभागाला दिली आहे.

या विभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण वनपरिमंडल अधिकारी राहुल रासकर वनरक्षक पोपट कोळी, तसेच गोविंद निरडे यांनी घटनास्थळी रवाना झाले. असून

पुढील खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ते उपाययोजना केल्या जात आहेत. यावेळी वन अधिकाऱ्यांनी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी व सतर्क रहावे. व पुन्हा बिबट्या दिसल्यास त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये असे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button