महाराष्ट्रविशेषशहर
Trending

जेजुरी पोलिसांची मोठी कारवाई, प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या चार वर्षीय मुलाचा खून करणाऱ्या आईला व प्रियकराला केली अटक…..

जेजुरी पोलिसांची मोठी कारवाई, प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या चार वर्षीय मुलाचा खून करणाऱ्या आईला व प्रियकराला केली अटक…..

नमस्कार सर्व नात्यांमध्ये आईचे नातं ही सर्वश्रेष्ठ मानले जाते. मात्र कधीकधी काही काही घटना मन सुन्न करणाऱ्या असतात.. अशाच एका प्रेमसंबंधातून अडसर ठरणाऱ्या कारणावरून आपल्या स्वतःच्या चार वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्या आईला व तिच्या प्रियकराला अटक करण्यात जेजुरी पोलिसांना यश आले आहे .याबाबत सविस्तर हकीकत अशी की रेणू शंकर पवार व तिचा नवरा शंकर पवार हे दोघे नवरा बायको विजापूर या ठिकाणी राहत होते. मात्र तिच्या नवऱ्याचं एका वर्षापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे ती तिच्या चार वर्षाच्या मुलाबरोबर व उमेश साळुंखे असे मिळून उरळीकांचन पासून जवळ पांढरे वस्ती माळशिरस येथील एका ठिकाणी घराच्या बांधकामावर काम करत असताना तिथेच राहत होते. तेव्हा एक दिवस सुमारे दीड महिन्यापूर्वी रात्रीच्या वेळी चार वर्षीय मुलगा चुटक्या याचा उमेश साळुंखे यांने प्रेम प्रकरणात अडथळा होत असल्याने त्या मुलाचा गळा दाबून खून केला.

व सकाळी आठच्या सुमारास रेणू पवार व उमेश साळुंखे असे दोघांनी मिळून मुलाचा मृतदेह एका साडी मध्ये गुंडाळून यवतकडे जाणाऱ्या भुलेश्वर घाटात मोटरसायकल घेऊन जाऊन टाकून दिला व मोडनिंब या ठिकाणी निघून गेले. सदर प्रकार समजल्यावर चुलीत बहीण या हादरून गेल्या व त्यांनी याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना दिली.व फिर्याद दिली. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी कारवाई करत यातील आरोपी रेणु पवार व उमेश साळुंखे या दोघांना अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button