महाराष्ट्रविशेषशहर
Trending

जेजुरी पोलिसांचा लॉजवर छापा…वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश…

जेजुरी पोलिसांचा वेश्या व्यवसायावर छापा, तीन पिडीताची सुटका.

नमस्कार जेजुरी पोलीस स्टेशन येथे नव्याने पदभार स्वीकारलेले स.पो.निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध व्यवसायाच्या विरोधात धडक मोहीम उभारली आहे. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी जेजुरी सासवड रोडवर लक्ष्मीनारायण लॉज तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसाय उघड केलाआहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की सासवड जेजुरी रोड वर असलेल्या लक्ष्मीनारायण लॉज येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता तीन पीडित महिला आढळून आल्या. तसेच रोख रक्कम मिळून सुमारे 11580 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी रामा मोगरा याच्या सांगण्यावरून मॅनेजर रविष केशव देश भंडारी राहणार ठाणे सध्या राहणार लक्ष्मीनारायण लॉजिंग अँड बोर्डिंग रेस्टॉरंट तालुका पुरंदर जिल्हा पुणे २) प्रथमेश रामचंद्र जावळे राहणार खडकी देवळा जिल्हा बीड यांनी स्वतःच्या आर्थिक फायदे करता तीन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले त्याच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम तीन चार पाच सह भा.द.वि.क 370,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी संदीप पांडुरंग मोकाशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दाखल केली, असून सदर प्रकरणाचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मदने करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button