महाराष्ट्र
Trending

हातात धारदार कोयता घेऊन दहशत, पोलिसांनी केली दोघांना अटक, दौंड मधील घटना…

दौंड शहरात हातात धारदार कोयता घेऊन दहशत, पोलिसांनी दोघांना केली अटक, दौंड न्यायालयाने दिली दोन दिवसाचे पोलीस कस्टडी.

दौंड ( प्रतिनिधी) दौंड शहरामध्ये हातात धारदार कोयता घेऊन शहरातील रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या दोघांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राकेश जगताप आणि सचिन नलावडे हे दोघे शहरातील रस्त्यावर हातात कोयता घेऊन मोटरसायकलवर फिरत असताना पोलिसांना माहिती मिळाली.

यावरून पोलिसांनी दोघांना अटक केलीय. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या दोघांनाही दौंड न्यायालयमध्ये हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे,

या दोघांविरोधात दौंड पोलीस अक्षय घोडके यांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, ही कारवाई दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग थोरात, सुरेश चौधरी पोलीस हवालदार वाघ, देसाई यांनी कारवाई केली,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button