सासवड पोलिसांची बेशिस्त वाहन चालकावर दंडात्मक कारवाई

सासवड पोलीस स्टेशन कडून सासवड शहरात नाकांबदी’….बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
सध्या तरुण मुलांमध्ये मोटर सायकल वरती वेगळे प्रकारचे स्टंट करण्याची क्रेज निर्माण झाली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस सुद्धा वेळोवेळी त्यांच्यावरती कारवाई करत असतातच. सासवड शहरात बरीच तरूण मुलं,आपल्या बुलेट मोटार सायकल, बजाज पल्सर अशा वेगवेगळया रेसर बाईक भरधाव वेगात चालवतात, काही मुले तर एका मोटार सायकलवर तिन जण बसुन फिरतात, एवढेच नाही तर बुलेटच्या सायलंसर मधुन मोठमोठयाने कर्णकर्कश फटाक्यासारखे आवाज काढुन दहशत निर्माण करत फिरत असलेबाबत बऱ्याच तक्रारी सासवड पोलीसांकडे येत होत्या, त्या अनुशंगाने सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी आज दुपारी चार वाजता अचानक सासवड एस.टी.बस स्टॅंड येथे वाहतुक पोलीस स्टाफसह नाकाबंदी करण्यात आली, नाकाबंदीमध्ये विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सिट फिरणे, वाहन चालवतांना मोबाईल फोनचा वापर करणे, वाहन चालवण्याचा परवाना सोबत न बाळगता वाहन चालवणे, दुचाकी बुलेट मोटार सायकलचे सायलंसरमध्ये बदल करून कर्णकर्कश फटाक्यासारखे आवाज काढणे अशा प्रकारची वाहतुन नियमानुसार कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईमध्ये वाहतुक ई.चलन मशीनदवारे एकुण ४९ वाहतुक केसेस करून ७६,४००/-(शहात्तर हजार चारशे रूपये) दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे सासवड पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येत आहे की, सासवड परीसरात अशा प्रकारच्या बेशीस्त वाहन चालकांवर रोज कारवाई करण्यात येणार असुन नागरिकांनी तसेच काॅलेज मधील युवकांनी विनापरवाना वाहन चालवु नये. वाहन चालवतांना मोबाईलचा वापर टाळणे, दुचाकी वाहनावर ट्रिपल सिट फिरू नये. पालकांनी अल्पवयीन मुलांकडे वाहन चालवण्यास देवुन नये. बुलेट मोटार सायकलचे सायलंसरमध्ये बदल करू नये व वाहतुकीचे नियम पाळावेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी , भोर विभाग तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन संतोश जाधव, पोलीस उप.निरीक्षक विनय झिंजुर्के, पोलीस अंमलदार रूपेश भगत, गणेश पोटे, निलेश जाधव, योगेश गरूड, सुरज नांगरे, जब्बार स्ययद, सुहास गाडेकर, प्रतिक धिवार, संजय दाने, होमगार्ड विक्रम जगताप, ट्राफिक वार्डन श्रीकांत भंडलकर, चक्रधर गोपाळघरे, ऋतुराज देसाई यांचे पथकाने केलेली आहे.


