धक्कादायक! दरड कोसळून पाच जण ठार…. तर अनेक जण ढिगारे खाली अडकल्याची भीती…
धक्कादायक! दरड कोसळून पाच जण ठार…. तर अनेक जण ढिगारे खाली अडकल्याची भीती…
रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळगड गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी नाल्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर इर्शाळगड येथे रात्री अकराच्या दरम्यान दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली सुमारे २० ते २५ घरे दबल्याची शंका असून सुमारे पन्नास च्या वर नागरिक यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य सुरू केले असून शेजारच्या गावातील गावकरी सुद्धा मदत करण्यात गुंतले आहेत.
आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगून आश्वस्त केले. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली असून जखमीचा सर्व खर्च सरकार करेल असे जाहीर केले.
तसेच ही दुर्घटना भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम ठिकाणी घडल्याने हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या. सध्या एनडीआरएफची पथके याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत असून त्यांच्या कामाचा आढावा देखील यावेळी घेतला. तसेच हे मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी निर्देश दिले.
यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार महेश थोरवे, आमदार महेश बालदी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, विभागीय आयुक्त महेश कल्याणकर उपस्थित होते.