पुरंदर तालुक्यात शिषयवृत्तीमध्ये कु. अनघा जगताप प्रथम
पुरंदर : सासवड येथील म.ए.सो. विद्यालयातील विद्याथिनी अनघा रमेश जगताप हिने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तिला ३०० पैकी २६२ गुण मिळाल्याने राज्य गुणवत्ता यादीत १८ वा तर पुरंदर तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला. अनघाच्या या यशाबद्दल तिचे
सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अनघा जगताप ही शिक्षक नेते रमेश जगताप व आदर्श शिक्षिका स्वाती जगताप यांची ती कन्या आहे.