दौंड ताुक्यातील खोरवडी गावातील धक्कादायक घटना, महिलेला प्रेम संबंध ठेव म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांवर दौंड पोलिसात गुन्हा दाखल
दौंड( प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील खोरवडी गावामधील पीडित महिला राहत असून तिला तिच्या भावकीतील शेखर भरत दळवी, प्रकाश भरत दळवी, व त्याची आई सर्व राहणार मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे,यांनी 23 वर्षीय महिलेला शेखर भरत दळवी याने तू माझ्यासोबत प्रेम संबंध ठेव अन्यथा तुला व तुझ्या बाळाला मारून टाकू असे म्हणून शेखर दळवी यांने आपल्या सोबत आणलेल्या तलवारीने तलवारीने डोक्यात वार करत असताना महिलेने वार अडवण्यासाठी हात वर केल्याने तलवारीचा वार आता त्या बोटावर लागल्याने काही बोटे निकामी झाले आहेत, अशा अवस्थेमध्ये शेजाऱ्यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयामध्ये पीडित महिलेला दाखल करण्यात आले आहे या महिलेच्या फिर्यादीवरून शेखर भरत दळवी, त्याचा भाऊ प्रकाश भरत दळवी, व त्याची आई यांच्यावर दौंड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न , विनयभंग, आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव व दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या आदेशाने शेखर भरत दळवी व प्रकाश भरत दळवी यांना अटक करण्यात आली असून त्यांना दौंड न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे, अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली आहे.