विशेष
Trending

ब्रेकिंग न्यूज !२३ जुलै रोजी जेजुरीत होणारा” शासन आपल्या दारी” कार्यक्रम पुन्हा रद्द! मात्र कार्यक्रम पुन्हा कधी होणार? याचीच नागरिकांमध्ये चर्चा.

ब्रेकिंग न्यूज !२३ जुलै रोजी जेजुरीत होणारा” शासन आपल्या दारी” कार्यक्रम पुन्हा रद्द! मात्र कार्यक्रम पुन्हा कधी होणार? याचीच नागरिकांमध्ये चर्चा.

नमस्कार मोठा गाजावाजा करत महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभर जाहीर केलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जेजुरीत येत्या रविवारी 23 जुलै रोजी होणार होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार असल्याने या कार्यक्रमाचे साठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र हा कार्यक्रम आता चौथ्यांदा रद्द झाल्याने या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिक व लाभार्थ्यांमध्ये याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे.. सध्या महाराष्ट्रातील कोकण विभागात मुसळधार पाऊस कोसळत आहे, तसेच पुणे जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येत्या दोन दिवसात रेड अलर्ट व पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून नुसार मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या संभाव्य नैसर्गिक परिस्थितीचा त्रास होऊ नये म्हणून कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मात्र या कार्यक्रमासाठी गेले कित्येक दिवस प्रशासनाकडून मोठी जय्यत तयारी करण्यात येत आहे मोठे मोठे मांडव, शेड उभे करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भव्य बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच स्वागत कमानी सुद्धा उभारण्यात आल्या आहेत. जेजुरी एसटी स्टँड ची रस्त्याची डागडुजी सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र हा कार्यक्रम चौथ्यांदा रद्द झाल्याने नागरिक याची चर्चा करताना दिसून येत आहेत. व कार्यक्रम आता पुन्हा कधी होणार? हाच प्रश्न सगळीकडे चर्चिला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button