महाराष्ट्र
Trending

धक्कादायक!विषारी नाग चावल्याने लोणी भापकर येथील सर्पमित्र विजय यादव यांचा अखेर मृत्यू….

लोणी भापकर येथील सर्पमित्र विजय यादव यांचा विषारी नाग चावल्याने अखेर मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील प्रसिद्ध सर्पमित्र विजय छबुराव यादव यांच्या बाबतीत घडली आहे विजय यादव हे दिनांक 15 ऑगस्ट रोजी सुपा येथील नजीकच्या खराडेवाडी परिसरात विषारी नाग पकडण्यासाठी गेले होते. जनावरांसाठी बनवलेल्या मुरघासाच्या खड्ड्यात हा विषारी नाग लपून बसला होता मात्र विजय यादव हे या नागास पकडण्यासाठी गेला असता अचानक या नागाने त्यांना सर्पदंश केला होता. . त्यांची प्रकृती सुधारणा होत दिनांक 17 ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. मात्र आज अखेर शनिवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

विजय यादव हे गेल्या 30 वर्षापासून सर्पमित्र म्हणून परिसरात परिचित होते त्यांनी हजारो सापांना पकडून जीवदान दिले होते. या विषारी नागाने दंश केल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याही जखमी अवस्थेत त्या नागाला मोकळ्या रानात सोडून दिले होते. विजय यादव हे बारामती तालुका खरेदी विक्री संघात कर्मचारी म्हणून सेवेत होते. मात्र त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण बारामती तालुक्यामधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button