महाराष्ट्र
Trending
ब्रेकिंग न्यूज! भोरवाडी फाटा येथे दुचाकी व एसटी बसचा भीषण अपघात. एका तरुणाचा मृत्यू तर एक जण जखमी….
नमस्कार जेजुरी नीरा रोडवर भोरवाडी फाटा येथे दुचाकी व एसटीचा भीषण अपघात झाल्याने दुचाकी वरील दोन तरुणांपैकी एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पंढरपूर सांगोला ही सदर एसटी असून या एसटीची व दुचाकीची समोरून धडक झाल्याची माहिती मिळत आहे.
सदर तरुणांपैकी एक तरुण सुकलवाडी गावचा रहिवाशी प्रशांत दाते असून त्याचा यात मृत्यू झाला आहे दुसरा तरुण वाल्हे गावचा रहिवासी तुषार असून।सदर युवक गंभीर जखमी आहे.अपघात स्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
जखमी युवकास जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारार्थ खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सदर घटनेचे वृत्त कळताच ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.