आधी मुहूर्त काढून नंतर सुमारे एक कोटीच्या मुद्देमालावर दरोडा…. मात्र स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद….
आधी मूहर्त काढला… नंतर महिलेचे हात पाय बांधून मारहाण करून सुमारे एक कोटी रुपयांच्या मुद्दे मालावर दरोडा… मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद.
नमस्कार , बारामती पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाते नगर येथे सागर शिवाजी गोफणे हे त्यांची पत्नी तृप्ती सागर गोफणे असे दोन मुलासह राहत आहेत. दिनांक 21 एप्रिल रोजी सागर गोफने हे तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते. रात्री आठच्या सुमारास तृप्ती गोफणे या त्यांच्या लहान मुलांसह घरी असताना चार अनोळखी चोरट्यानी घराच्या कंपाउंड भिंतीवरून आत प्रवेश केला. व तृप्ती गोफने यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले व तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरात प्रवेश केला .आणि रोख रक्कम 95 लाख तीस हजार रुपये रोख व सुमारे 20 तोळे वजनाचे 11 लाख 59 हजार 300 रुपये चे सोन्याचे दागिने आणि 35 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण एक कोटी सात लाख 24 हजार 300 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. त्याबाबत तृप्ती गोफने. राहणार देवकाते नगर बारामती यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती व त्यानुसार भारतीय दंड विधान कायदा कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता .
बारामती शहरात घडलेल्या या दरोड्यामुळे मोठी खळबळ माजली होती .मात्र गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य पाहता विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सो,कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुरी यांनी तातडीने तसेच वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना केल्या. त्याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथके नेमून गुन्ह्याच्या अनुषंगाने सीसीटीव्ही गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन गुन्हा ऊघडकिस आणण्यासाठी कामी काही योजना तयार करून मार्गदर्शन केले. आणि दर आठवड्याला सदर गुन्ह्याचे बाबत मागोवा घेतला. गुन्हा करणारे आरोपीने आपण पकडले जाऊ नये याकरिता सर्वतोपरी काळजी घेऊन कोणताही मागमूस ठेवला नव्हता .मात्र नेमलेल्या तपास पथकाने सीसीटीव्हीचे प्राप्त फुटेज मधील आरोपीचे वर्णन , पेहराव असे बारकावे तपासून गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण होण्याची उकल करून आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
गुन्हयातील आरोपी हे एमआयडीसीतील मजूर कामगार असल्याची माहिती पुढे आल्यानंतर संशयित आरोपींचे हालचालीवर बारकाईने लक्ष केंद्रित करून खात्री झाल्याने आरोपी नामे १) सचिन अशोक जगधने वय 30 वर्ष व्यवसाय नोकरी राहणार गुणवडी २)रायबा तानाजी चव्हाण वय 32 वर्ष राहणार शेटफळ हवेली३) रवींद्र शिवाजी भोसले वय 27 वर्ष राहणार निरावागज व४) दुर्योधन उर्फ दीपक उर्फ पप्पू धनाजी जाधव वय 35 वर्ष राहणार जिंती तालुका फलटण व५) नितीन अर्जुन मोरे वय 36 वर्ष राहणार धर्मपुरी तालुका माळशिरस अशा तऱ्हेने वेगवेगळ्या गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकाने बारामती तालुका परिसर, मेखळी अशा वेगवेगळ्या परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे सागर गोफने हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून त्याच्याजवळ भरपूर पैसे असल्याबाबत माहिती आरोपी नामे सचिन जगधने यास मिळाली होती. त्याने गुन्ह्याचा कट रचला। तसेच सदरचा गुन्हा करणे पूर्वी आरोपी रामचंद्र वामन चव्हाण वय 43 वर्ष व्यवसाय शेती, ज्योतिष रा आंदरुड तालुका फलटण सध्या राहणार वडूज या ज्योतिष शास्त्र पाहणाऱ्या आरोपीस कटास सामील करून घेऊन त्याच्याकडून गुन्हा करण्यासाठी मुहूर्त काढून त्याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले . त्या आरोपीस देखील अटक केली गुन्ह्यास कट रचून दरोडे टाकल्याची कलमे वाढवण्यात आली आहेत .आरोपीकडून पंचनामेने अद्याप पर्यंत ७६ लाख ३२ हजार ४१० रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यामध्ये 60 लाख 97 हजार रुपये रोख रक्कम व 15 लाख 35 हजार 410 रुपये किमतीचे 26 तोळे वजणाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. आरोपी बारामती तालुका पोलीस यांच्या ताब्यात असून दिनांक 25 8 2023 पर्यंत कस्टडी मिळाली आहे .सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी ,पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण ,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे बारामती विभाग ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर, सपोनी नेताजी गंधारे, राहुल गावडे ,पोस ई अभिजीत सावंत, प्रदीप चौधरी ,शिवाजी ननवरे, अमित सिद पाटील, गणेश जगदाळे, सहा फौजदार रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे ,ज्ञानेश्वर शिरसागर, अजित भुजबळ ,अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, राजू मोमीन, अतुल ढेरे, चंद्रकांत जाधव ,मंगेश थिगळे, तुषार पंदारे ,जनार्दन शेळके ,योगेश नागरगोजे, दीपक साबळे, विक्रम तापकीर ,विजय कांचन ,अजय घुले, पोना निलेश शिंदे ,अमोल शेंडगे, बाळासाहेब खडके, संदीप वारे ,पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव अक्षय नवले ,मंगेश भगत, मुकुंद कदम, प्रमोद नवले ,पोलीस कॉन्स्टेबल दगडू विरकर, अक्षय सुपे यांनी केले असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे ,पोसई राजेश माळी पोलीस शिपाई दीपक दराडे हे करत आहेत.