
आमदार रोहित पवार यांचा संभाजी भिडे प्रकरणावरून फडणवीस यांच्यावर निशाणा … पहा काय आहे प्रकरण.

नमस्कार काही दिवसापूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल वादग्रस्त विधाने केली होती. त्यावरून मोठा गदारोळ उठला होता. त्यानंतर काही दिवसांनीच त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री साईबाबां वरती सुद्धा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती .

संभाजी भिडे यांनी केलेल्या साईबाबा बद्दलच्या वक्तव्याचा शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांनी जोरदार निषेध व्यक्त केला होता इतकेच नव्हे तर प्रकरणाचे गांभीर्य पाहून शिर्डी देवस्थान तर्फे संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे मात्र याच प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर गृहमंत्री या जबाबदारीने कारवाई करावी असे आव्हानच दिले आहे. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस हे साईबाबा यांचे दर्शन घेत असल्याचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आहेत.
आमदार रोहित पवार यांचा संभाजी भिडे प्रकरणावरून फडणवीस यांच्यावर निशाणा … पहा काय आहे प्रकरण.


