मराठी पत्रकार दिनानिमित्त जेजुरी पोलीस स्टेशन येथे कार्यक्रमाचे आयोजन..
भारतातील ब्रिटीश राजवटीच्या सुरुवातीच्या काळात दर्पण या भाषेतील पहिल्या वृत्तपत्रातून मराठीत पत्रकारिता सुरू करणारे ते पहिले होते. त्यामुळे त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे अवचित्य साधत पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नव्यानेच उभारण्यात आलेल्या मल्हार नाट्यगृह जुने सांस्कृतिक भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा वेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खाडे,बी. एम. काळे, विजयकुमार हरिश्चंद्रे,निलेश जगताप, यांनी आपले मनोगत मांडले. तर स.पो.नी दीपक वाकचौरे यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पत्रकार हा लोकशाहीतील चौथा महत्त्वाचा स्तंभ असल्याने पत्रकारांनी आपले काम तत्त्वाने व निष्ठेने करावे. असे सर्वांनीच अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जेजुरी,निरा, लोणंद येथील जवळपास सर्वच ज्येष्ठ व युवा पत्रकारांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप, नि, सर्जेराव पुजारी, उपनिरीक्षक महेश पाटील, उपनिरीक्षक दिपाली पवार व पोलीस कर्मचारी वर्ग यांनी या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जी खाडे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नितीन राऊत यांनी केले. व पत्रकार प्रकाश खाडे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमानंतर सर्व पत्रकार बांधवांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.