धक्कादायक! जेजुरी येथे गॅरेज मधून दुरुस्तीसाठी लावलेली चारचाकी चोरट्यांनी केली पसार…
धक्कादायक! जेजुरी येथे गॅरेज मधून दुरुस्तीसाठी लावलेली चारचाकी चोरट्यांनी केली पसार…
जेजुरी येथील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी लावलेली चार चाकी वाहन अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे.याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील मारुती यादव राहणार गिरेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा यांच्या मालकीची महिंद्रा मॅक्स पिकप गाडी एम एच 11 ए जी तेहतीस झिरो वन ही गाडी चार चाकी वाहनांची विक्री करणारे शंकर माळवे यांना विकली होती. व शंकर माळवी यांनीही सदर चार चाकी वाहन नितीन गोरख गायकवाड यांना विकले होते. मात्र गोरख गायकवाड यांनी सदर चार चाकी वाहनाचे वायरिंग चे काम करण्याच्या कामी हे वाहन जेजुरी येथील वायरिंग चे काम करणारे संकेत सुरेश इंगळे यांच्याकडे दिले होते .सदर वायरिंग चे काम झाल्यावर हे वाहन साई गॅरेज येथे लावण्यात आले होते. मात्र फिर्यादी वाहन आणण्यासाठी साई गॅरेज येथे गेले असता ते वाहन आढळून आले नाही.अधिक तपास केला असता सदर वाहन हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून इल्याचे निष्पन्न झाले.या कारणास्तव फिर्यादी यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात चार चाकी वाहन चोरून येण्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांकडून भारतीय न्याय संहिता कलम 303(२) 289/2024 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुजावर व पोलीस हवालदार पिंगळे अधिक तपास करत आहेत