लवथळेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण.
जेजुरी दि. (प्रतिनिधी) श्री क्षेत्र जेजुरी येथील ऐतिहासिक लवथळेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सात दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह. भ. प. दिलीप महाराज जगताप, ह.भ.प. माधव महाराज रसाळ, ह.भ.प. पांडुरंग महाराज गुरव, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, ह.भ.प. संजय महाराज शिर्के, ह.भ.प. आकाश महाराज कामथे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, आदि किर्तनकारांची किर्तन सेवा होणार असून शनिवार दिनांक १७/८/२०२४ रोजी ह.भ.प. दत्तात्रय महाराज फरांदे याचे काल्याचे किर्तन होऊन अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे पन्नास पेक्षा अधिक महिला शिवलीलामृत पारायणाचे वाचन करत आहेत या सात दिवसांत काकडा,पारायण, हरिपाठ ,प्रवचन, भजन आदि कार्यक्रमाबरोबरच दररोज मंडळाच्या वतीने चहा नाष्टा व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे या पारायण सोहळ्याचे आयोजन ह.भ.प.पोपटनाना पवार,शंकर महाराज म्हस्के, विनायक महाराज बेलसरे, रमेश महाराज उबाळे, संतोषशेठ बयास,रमेशशेठ लेंडे,सचिनशेठ बयास,गणेश दुधाळ,हनुमंतराव बयास, ऋषीकेश जगताप,व लवथळेश्वर परीसरातील नागरीकांनी केले आहे.