जेजुरीत देवाच्या पहिली पायरी शिवलिंगाची महापूजाजागरण गोंधळ,भजन,महाप्रसादाचे वाटप.
जेजुरीत देवाच्या पहिली पायरी शिवलिंगाची महापूजा
जागरण गोंधळ,भजन,महाप्रसादाचे वाटप
जेजुरी दिनांक ५.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील देवाची पहिली पायरी असणाऱ्या शिवलिंगाची श्रावणी सोमवार निमित्त महापूजा करण्यात आली. यावेळी जागरण गोंधळ,भजन या धार्मिक विधी बरोबरच सातशे किलोची खिचडी आदीचसे डझन केळीचे वाटप करण्यात आल्याचे मंडळाचे कार्यकर्ते संतोष कांबळे यांनी सांगितले.
अखिल छत्रपती शिवाजी महाराज चौक जेजुरी,शिवशंभू प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ जेजुरी यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते कै अशोक काळे यांच्या समरणार्थ सलग तेराव्या वर्षी जेजुरी शहरातील खंडोबा देवाची पहिली पायरी असणाऱ्या शिवलिंगाची श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक महापूजा करण्यात आली.
यावेळी जागरण गोंधळ,भजन,कीर्तन या धार्मिक उपक्रमा बरोबरच सातशे किलो खिचडी,व अडीचशे डझन केळीचे भाविकांना वाटप करण्यात आले.यासाठी श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी,जयमल्हार केटर्स मोहन महाराज खोमणे यांनी सहकार्य केले.
मंडळाचे कार्यकर्ते संतोष खोमणे,गणेश जाधव,संदीप शेवाळे,संजय गायकवाड,संजय माळवदकर,अमोल शेवाळे,राजेंद्र गायकवाड,दीपक पवार आदींनी या उपक्रमाचे नियोजन केले.