महाराष्ट्रविशेषशहर
Trending

नाव “कॅफे” मात्र आत मध्ये भलतंच…. बारामती तालुका पोलिसांनी केला कॅफे चालकावर गुन्हा दाखल

नाव कॅफे मात्र आत मध्ये भलतंच बारामती पोलिसांनी केला कॅफे चालकावर गुन्हा दाखल.

नमस्कार बारामती शहरात एमआयडीसी परिसरात विद्या कॉर्नर येथे एका कॅफे च्या नावाखाली आत मध्ये मुलं व मुली अश्लील वर्तन करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत सदर कॅफे मालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमध्ये विद्या कॉर्नर बारामती येथील कॅफे ग्राउंड अप येथे सदर कॅफेची आत पडदे लावून पार्टिशन केलेल्या जागेमध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुले व मुली एकांतात बसून असभ्य वर्तन व अश्लील चाळे करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी कॅफे ग्राउंड अप विद्या कॉर्नर चे मालक सुहास तानाजी कदम व मॅनेजर मयूर बाळू कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामतीतील एमआयडीसी परिसरातील विद्या प्रतिष्ठान शाळेच्या परिसरामध्ये बरेच कॅफे सुरु करण्यात आले असून या कॅफेत महाविद्यालयीन मुला-मुलींना निवांत पाने गप्पा मारता येतील असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे कॅफेस जाण्याकडे तरुण-तरुणीचा कल वाढला असून त्याचा व्यवसाय तेजीत आलाय त्यामुळे संबंधित कॅफेसरकावरती कारवाई व्हावी अशी नागरिकांमधून चर्चा होत होती. याबाबत पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले की पालकांनी सुद्धा याबाबत गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे असून संबंधित सर्व कॅफे चालकांना नोटीस बजविण्यात आल्या असून त्यांनी कॅफेमधील पार्टिशन काढून टाकले नाही तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल व सदर कॅफे चालकाचे परवाने रद्द करण्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकारी बारामती यांना पाठवण्यात येणार आहे.

ही सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे बारामती विभाग व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती व बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button