मावडी क.प. येथे अक्षरसृष्टीच्या सहकार्याने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
अक्षरसृष्टीच्या सहकार्याने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.
मयुर कुदळे
जेजुरी प्रतिनिधी
अक्षर सृष्टी पुणे, या संस्थेच्या माध्यमातून तसेच स्व. प्राचार्य हनुमंतराव चाचर विकास प्रतिष्ठान पुरंदर, यांच्या संयुक्त सहकार्याने मावडी क.प. येथे अंगणवाडीतील 200 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मावडी क.प. शिंदेवाडी, मांडकी, जेऊर गावठाण, तांबे वस्ती, साकुर्डे, या गावातील अंगणवाडीच्या 200 विद्यार्थिनींनी सहभागी होत लाभ घेतला. कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर अक्षरसृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार, उत्तम धुमाळ, प्रतीक धुमाळ, मोहन जगताप, जनार्दन तांबे, जयश्री चाचर, सत्यवान चाचर, बाळासाहेब जगताप, सारिका भामे, भाऊसो गायकवाड, विक्रम जगताप, तेजस चाचर, कुलदीप चाचर, सुकुमार भामे, सुहास खरात, अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडीतील विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी उद्योजक विक्रम सस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश चाचर तर सूत्रसंचालन प्रकाश भामे यांनी केले . कुलदीप चाचर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुनील भामे यांनी आभार मानले.