कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा टेम्पो गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडला. जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
नमस्कार एका टेम्पोमध्ये दाटीवाटीने जनावर भरून ती कत्तलीसाठी नेत असताना पुरंदर तालुक्याच्या हद्दीत नीरा येथे काही गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी दीड च्या दरम्यान नीरागावच्या हद्दीत महादेव मंदिराच्या समोर एक आयशर टेम्पो काही गोरक्षकांनी पकडला होता. सदर टेम्पोमध्ये सुमारे वीस जनावरे अत्यंत दाटीवाटीने व क्रूरपणे बांधण्यात आली होती. अधिक चौकशी केला असता त्यांच्याकडे त्या जनावरांची कसलीही मेडिकल सर्टिफिकेट अथवा जाणारे वाहून नेण्याचा परवाना नव्हता. सदरची बाब सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा गोरक्षक दल महाराष्ट्र राज्य संघटनेचे गोरक्षक अक्षय शिरसागर, गौरव राजेश पिसाळ, संजय मोहिते लक्ष्मण शिंदे, तेजस पवार, सुरज शिंदे यांनी निरा दूरक्षेत्र येथे कळवली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी, पोलीस हवालदार मदने, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांनी सदर टेम्पोची तपासणी केली याबाबत जैद अब्दुल खान. राहणार कल्याण मुंबई व अरबाज ताहीर मलिक राहणार कल्याण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस करत आहेत.