पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे “इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी” या महाविद्यालयामध्ये सेंडऑफ पार्टीचे आयोजन
दिनांक 24/06/२०२3
सेंडऑफ पार्टीचे आयोजन:-
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे “इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी” या महाविद्यालयामध्ये सेंडऑफ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे संचालक डॉ.संजय शिंदे ह्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमामध्ये मॅनेजमेंट गेम्स घेण्यात आले. तसेच द्वितीय वर्षाच्या मुलांना त्यांना आलेले अनुभव शेअर करण्याची संधी दिली. त्यांना कॉलेज ची आठवण म्हणून गिफ्ट देण्यात आले. सदर कार्यक्रमाला मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे नियोजन डॉ.संतोष खलाटे ह्यांच्या कल्पनेतून झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एमबीए च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्याप केतर कर्मचारी उपस्थित होते.स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एमबीए च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांने प्रदीप भांडवलकर व पूजा वनारे यांनी केले.